रविवार, २८ जुलै, २०२४

"Paris Olympic 2024 मध्ये पहिल्यांदाच एक Table Tennis खेळाडू ध्वजवाहक बनला आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे."
 - एक शरथ कमल

ज्या वयात बहुतेक खेळाडू Retirement चा विचार करतात, त्या वयात शरथ कमल सतत कठोर Practice करत आहे. आणि देशासाठी Medal आणण्याची तयारी करत आहे. त्याचे हे पाचवे Olympic आहे.

"मी 2004 मध्ये सुरुवात केली तेव्हा मला वाटले नव्हते की मी इतके वर्षे खेळू शकेन. Rio Olympic 2016 नंतर मी पुढे काय करू शकतो याचा विचार केला; कारण तेव्हा मी 30-32 वर्षांचा होतो. यानंतर, Commonwealth Games 2022 मध्ये मी Gold जिंकले, त्यामुळे मी नेहमीच Short Term Goal चा विचार करून चालतो."

शरथ कमलने Commonwealth Games मध्ये भारतासाठी अनेक Gold Medals जिंकली आहेत, पण Olympic मध्ये एकही पदक त्याच्या नावावर नाही. पण यावर्षी तो Gold मिळवण्याच्या ध्येयानेच मैदानात उतरणार आहे. या 42 वर्षीय खेळाडूने Asian Games 2018 मध्ये दोन Bronze Medals ही जिंकली होती.

1982 मध्ये चेन्नईमध्ये जन्मलेला शरथ फक्त 4 वर्षांचा होता जेव्हा त्याचा खेळाचा प्रवास सुरू झाला. त्याच्या वडिलांनी त्याला #TableTennis ची ओळख करून दिली आणि नंतर वयाच्या 12-13 व्या वर्षी त्याने ते Career म्हणून निवडले. त्यांची खेळाची आवड आणि चिकाटी अशी होती की तो त्याच्या वडिलांना सकाळी लवकर उठवून त्यांच्यासोबत सराव करत असत.

शाळेनंतर जेव्हा त्याने वडिलांना Engineering ऐवजी Sports मध्ये Career karnyachabनिर्णय सांगितला; तेव्हा पालकांनीही आपल्या मुलाला साथ दिली आणि त्याची प्रतिभा पाहून त्याला पुढे नेण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

वडिलांनी शरथसाठी एक चांगला दिनक्रम तयार केला, त्याला वेळेवर झोपायला आणि Training साठी वेळ काढायला शिकवले. त्याच वेळी, त्याच्या आईने देखील मुलाला कोणत्याही विचलनापासून दूर ठेवण्यासाठी स्वतः TV पाहणे बंद केले. आई-वडील प्रत्येक पावलावर त्याचे मनोबल वाढवत राहिले. त्यामुळेच शरथ आज इथपर्यंत पोहोचला आहे.

Olympic 2024 मध्ये Medal जिंकून शरथ केवळ त्याच्या आई-वडिलांचेच नाही तर संपूर्ण देशाची शान वाढवणार आहे. 
संपूर्ण देशाच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत.💙🇮🇳💪🏻

 #SharathKamal #Paris2024 #TableTennis #Olympics #TeamIndia
[Sharath Kamal, table tennis, Paris Olympics 2024, India, Inspiration, Team India]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post