गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

२४००वर्षा पूर्वी (टपाल )निरोप पाठवणे हि कल्पना इजिप्त मध्ये होती .आज अंतरराष्ट्रीय टपाल दिवस ..
ग्रीस मध्ये इ . स पूर्व ५५० मध्येही टपाल सेवेचा उल्लेख आहे .

भारता मध्ये इ . स पूर्व ३२२ मध्ये मौर्य काळात टपाल व्यवस्था होती . 

#रुक्मिणीने_कृष्णाला #पत्र पाठविल्याचा महाभारतात उल्लेख आहे (#भारतातील_पहिले_प्रेमपत्र ) 

भारतात ईस्ट इंडिया कंपनीने १८३७ मध्ये पोस्ट विभाग चालू केला पण तो फक्त कार्यालयीन कामासाठी होता 

भारतात  पोस्टखाते १८५८ मध्ये अस्तित्वात आले.

आज जागतिक टपाल दिन "

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

संतुलित जीवनशैली

आजच्या जीवनशैलीत शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व

आजचे जग वेगवान, तंत्रज्ञानाकडे झुकलेले आणि स्क्रीन-आधारित झाले आहे. कामाचे वाढते तास, मोबाईल व संगणकावर जास्त वावर आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे प्रत्येकाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. म्हणून शारीरिक तंदुरुस्ती ही एखादा छंद किंवा फुरसतीतील गोष्ट नसून प्रत्येकासाठी जीवनाचा पाया ठरते.

तंदुरुस्ती म्हणजे काय?

शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे –

  • दैनंदिन कामे ऊर्जेने पार पाडण्याची क्षमता

  • शरीरातील योग्य ताकद, लवचिकता व सहनशक्ती

  • तणावाला सामोरे जाण्याची शक्ती

  • दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्याची गुरुकिल्ली

शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व

१) बैठ्या सवयींशी लढा

  • आधुनिक जीवनात वेळेचा मोठा भाग बसून जातो.

  • व्यायामामुळे शरीर सक्रिय, रक्ताभिसरण सुरळीत आणि उर्जा संतुलित राहते.

२) जीवनशैलीतील आजारांपासून बचाव

  • मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा व हृदयविकार हे कमी हालचालींमुळे निर्माण होतात.

  • व्यायाम हा निसर्गाने दिलेला मोफत औषधोपचार आहे.

३) मानसिक आरोग्य व आनंद

  • व्यायामाने एंडोर्फिन ("हॅप्पी हार्मोन्स") स्रवतात.

  • चिंता, नैराश्य यावर नियंत्रण मिळते आणि आत्मविश्वास वाढतो.

४) उत्पादकता व कार्यक्षमता

  • लक्ष केंद्रीकरण, स्मरणशक्ती व निर्णयक्षमता मजबूत होते.

  • विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यावसायिक सर्वांनाच कामात गती व परिणामकारकता जाणवते.

५) गाढ झोपेचे वरदान

  • व्यवस्थित व्यायामामुळे शरीर रिलॅक्स होते.

  • जैविक घड्याळ सुरळीत चालते आणि गुणकारी झोप मिळते.

वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रेरणादायी उदाहरणे

  • आयटी क्षेत्रातील कामगार → प्रत्येक २ तासांनी डेस्कपासून उठून ५ मिनिटांचा वॉक.

  • विद्यार्थी → सकाळी ३० मिनिटे धावणे किंवा खेळल्याने अभ्यासात लक्ष केंद्रित.

  • गृहिणी → घरातील कामांसोबत योगा व पायऱ्या चढणे यांनी तंदुरुस्ती.

  • ज्येष्ठ नागरिक → हलके फिरणे, प्राणायाम यामुळे आरोग्य टिकून राहते.

तंदुरुस्त राहण्यासाठी सोपे उपाय

  • दररोज किमान ३० मिनिटे चालणे, धावणे, योगा किंवा पोहणे.

  • लिफ्टऐवजी पायऱ्या निवडणे.

  • आठवड्यातून एकदा सायकलिंग, खेळ किंवा ट्रेकिंग.

  • संतुलित आहार – प्रथिने व जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात.

  • मोबाईल/टीव्हीचा स्क्रीन टाइम कमी करणे.

तंदुरुस्तीचे एकत्रित फायदे

  • निरोगी शरीर आणि निरोगी मन

  • आयुष्यभर रोगप्रतिकारक क्षमता

  • आत्मविश्वास व आनंदी दृष्टीकोन

  • सामाजिक व व्यावसायिक जीवनात ऊर्जा आणि सशक्तता

  • दर्जेदार आणि परिपूर्ण जीवन"तंदुरुस्त शरीर म्हणजे अमूल्य संपत्ती.

ते फक्त चांगले दिसण्यासाठी नाही तर चांगले जगण्यासाठी आवश्यक आहे.
आजच्या धावपळीत स्वतःवर गुंतवणूक करणे म्हणजे व्यायाम, योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली अंगीकारणे.
तंदुरुस्ती हीच खरी श्रीमंती आहे

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

भोंडल्याची गाणी संग्रह

*भोंडल्याची गाणी लिहून घ्या*

*पोस्ट खास त्याच्यासाठीच पाठवत आहे*

"भोंडला" 

'सूर नवा ध्यास नवा'  मध्ये अवधूत गुप्तेने लोकांना एक प्रश्न विचारला. गुजरात्यांचा गरबा तर आपल्याकडे काय असतं? कोणत्याही स्पर्धकाला उत्तर देता आलं नाही. मग प्रेक्षकांना विचारल्यावर दोन तीन जण भोंडला म्हणले. मग भोंडल्याचं एखादं गाणं कोणतं? हा दुसरा प्रश्न विचारल्यावर शुकशुकाट पसरला. मग एका काकूंनी 'एक लिंबू झेलू बाई' हे गाणं म्हणलं पण तेही अर्धवट. हे गाणं एकट्या अवधूत गुप्तेनी सलग गायलं. नंतर परीक्षणात तो म्हणाला की इतरांचे सण साजरे करताना आपण आपलं विसरत चाललो आहोत. हा आपला ठेवा आहे आणि  हे आपल्याला जपलंच पाहिजे. हे भान आपली 'बनाना' आणि 'अॅपल' पिढीला घडवण्याऱ्या आपल्या लोकांना कळेल तो सुदीन. 

"भोंडल्याची १६ गाणी"

भोंडला , भुलाई , हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला  जाणारा नवरात्रोत्सव आणि त्यातील लोकगीते  काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत , घरातल्या  मोठ्या व्यक्ती , आजी यांना ती  सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती , परंतु त्याची  कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती , गाणी सारे काही विरून जाते आहे .
चला तर मग अशा दुर्मिळ लोकगीतांचे संकलन आपल्याकडे असणे गरजेचे नाही का ?
तीच परंपरा तीच गाणी आता आपल्या स्मार्ट वहीमध्ये ...अर्थात आपल्या 
स्मार्टफोन मध्ये ...
आपली मैत्रीण गावाकडची असो कि शहरातील , सर्वानीच जपावा हा अनमोल ठेवा ...

लोकसंस्कृती आपण जपली तरच पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होऊ शकते , त्यामुळे आपल्या आई , बहीण , जावा , मैत्रिणी सगळ्यांना सुपूर्त करूयात हा "नवरात्रीचा अमूल्य ठेवा" ...

१ ) ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी , आयुष्य दे रे भामाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे
अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,
चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे
एकेक गोडा विसाविसाचा, साड्या डांगर नेसायच्या
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो
           **********

२ ) श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं
वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगड्या म्हणून त्याने हातात घातल्या
वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले
वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.
वेड्याची बायको झोपली होती
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले

          ************

३ ) नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी
           ************
४) कृष्णा घालितो लोळण,  आली यशोदा  धावून || धृ ||
काय रे मागतोस बाळा, तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण,  आली यशोदा  धावून...||धृ||
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण,  आली यशोदा  धावून....||२||
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण,  आली यशोदा  धावून...||३||
           ***********

५) एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
पाचा लिंबांचा पाणोठा
माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारिक वाळू
तेथे खेळे चिल्लारी बाळू
चिल्लारी बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपीने दूध पाजले
पाटावरच्या गादीवर निजविले
निज रे निज रे चिल्लारी बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले की नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी.. 
           ***********
६ ) अक्कण माती चिक्कण माती , खळगा जो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई, जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई, रवा-पिठी काढावी
अश्शी रवा-पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अशा करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा
अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं
        *************
७ ) अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा दत्ता ॥१॥

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता वाटी
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चाटी ॥२॥
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती भाकर
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा प्रभाकर ॥३॥
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता चेंडू
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा बंडू  ॥४॥

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता चष्मा
भुलाबाईला लेक झाली नाव ठेवा सुषमा / रेश्मा  ॥५॥

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता रुपया बंधा 
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चंदा  ॥६॥

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला अडकित्ता
भुलाबाईला मुलगी झाली, नाव ठेवलं स्मिता ॥७॥

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता पाटा
भुलोजीला लेक झाला साखर खडी वाटा, 
बाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा, गाणे संपले खिरापत आणा ॥५॥
            ***********
८ ) कारल्याचा वेल लाव गं सुने ,लाव गं सुने 
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई 
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥
कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥
कार्ल्याला फूल येऊ दे गं सुने येऊ दे गं सुने 
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥

कार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येऊ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥

कार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने 
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥

कार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥

आपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
माझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥
            ***********
९ ) आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे बुधवार । बृहस्पतीला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे गुरुवार । दत्ताला नमस्कार।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शुक्रवार । अंबाबाईला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शनिवार । शनिला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार ?
आज आहे रविवार । सूर्याला नमस्कार ।
         *************
१०) काही भागात कारल्याचा वेल ,त्याची पाने गोल गोल तुला न्यायाला कोण कोण आलं.
....
(अशी सुरुवात आहे )

 अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासरा
सासर्‍याने काय आणलं ग बाई ?
सासर्‍यानं आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥१॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं?
सासुने आणले गोट
गोट मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥२॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल दीर
दीरानं काय आणलं ग बाई ?
दीरानं आणल्या बांगड्या
बांगड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥३॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल जाऊबाई
जावेनं काय आणलं ग बाई ?
जावेनं आणली नथ
नथ मी घेत नाहीं, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥४॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नणंद
नणदेने काय आणलंय गं?
नणदेने आणल्या तोरड्या
तोरड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥५॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नवरा
नवर्‍याने काय आणलंय गं?
नवर्‍याने आणलं मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई
झिपर्‍या कुत्र्याला बांधा गं बाई, बांधा गं बाई ॥६॥
             ***********
११) सासरच्या वाटे कुचूकुचू काटे 
माहेरच्या वाटे नारळ फुटे 
कोण कोण पाहुणा आला गं बाई 
सासरा पाहुणा आला गं बाई 
सासऱ्याने काय काय आणले गं बाई 
सासऱ्यानी आणल्या पाटल्या गं बाई 
पाटल्या मी घेत नाही 
सांगा मी येत नाही 
चारी दारं लावा गं बाई 
झिपरं कुत्रं सोडा गं बाई 
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे 
माहेरच्या वाटे नारळ फुटे ...
कोण कोण पाहुणा आला गं बाई 
नणंद पाहुणी आला गं बाई 
नणंदेने काय काय आणले गं बाई 
नणंदेने आणला पोहेहार गं बाई 
पोहेहार मी घेत नाही 
सांगा मी येत नाही 
चारी दारं लावा गं बाई 
झिपरं कुत्रं सोडा गं बाई 
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे 
माहेरच्या वाटे नारळ फुटे ...
कोण कोण पाहुणा आला गं बाई 
दीर पाहुणा आला गं बाई 
दिराने काय काय आणले गं बाई  
दिराने आणले गोठ गं बाई 
गोठ मी घेत नाही 
सांगा मी येत नाही 
चारी दारं लावा गं बाई 
झिपरं कुत्रं सोडा गं बाई 
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे 
माहेरच्या वाटे नारळ फुटे 
कोण कोण पाहुणा आला गं बाई 
सासू पाहुणी आला गं बाई 
सासूने काय काय आणले गं बाई 
सासूने आणला राणीहार गं बाई 
राणीहार मी घेत नाही 
सांगा मी येत नाही 
चारी दारं लावा गं बाई 
झिपरं कुत्रं सोडा गं बाई 
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे 
माहेरच्या वाटे नारळ फुटे ...
कोण कोण पाहुणा आला गं बाई 
नवरा पाहुणा आला गं बाई 
नवऱ्याने काय काय आणले गं बाई 
नवऱ्याने  मंगळसूत्र आणले गं बाई 
मंगळसूत्र मी घेते  
सांगा मी येते 
चारी दारं उघडा गं बाई 
झिपरं कुत्रं आवरा गं बाई 
          **************
१२ ) हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा 
तयासी नमस्कार माझा ।। 
दहा मधले आठ गेले
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।

ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।। 

एकेक केळ मोठालं 
भोंडल्या देवा वाहिलं
               ***********
१३ ) माझ्या सुंद्रीचं लगीन
वराडी कोण कोण येणार, माझ्या सुंद्रीचं लगीन
भाऊ म्हणे मी भाऊ, आणीन नवरा पाहून
माझ्या सुंद्रीचं लगीन
बहिण म्हणे मी बहीण, करवली मी होईन
माझ्या सुंद्रीचं लगीन
बाप म्हणे मी बाप, खर्चीन हुंडा लाख
माझ्या सुंद्रीचं लगीन
आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई
माझ्या सुंद्रीचं लगीन
चुलता म्हणे मी चुलता, येईन जेवणापुरता
माझ्या सुंद्रीचं लगीन
चुलती म्हणे मी चुलती, 
येईन वरातीपुरती 
माझ्या सुंद्रीचं लगीन
मावसा म्हणे मी मावसा, 
बसेन दागिन्यासरसा
माझ्या सुंद्रीचं लगीन
मावशी म्हणे मी मावशी, फराळाचे माझ्यापाशी
माझ्या सुंद्रीचं लगीन
मामा म्हणे मी मामा, 
येईन सर्व कामा
माझ्या सुंद्रीचं लगीन

भट म्हणे मी भट, 
धरीन अंतरपाट
माझ्या सुंद्रीचं लगीन

भटीण म्हणे मी भटीण, सगळ्याच पोळ्या लाटीन
माझ्या सुंद्रीचं लगीन
            ***********
१४ ) सासरच्या जाच सांगणाऱ्या ह्या मुली सासरची बढाई सुद्धा तेवढीच रंगवून सांगायच्या. 

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे ॥१॥
भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीण जशा गं पाटलीण जशा ॥२॥
भुलाबाई भुलाबाई पुतणे कसे गं पुतणे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे ॥३॥
भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वयंपाकीण जशी गं स्वयंपाकीण जशी ॥४॥
भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे ॥५॥
भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी ॥६॥

भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे ॥७॥

भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा ॥८॥

भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकड्या सोंडेचे गणपती जसे गं गणपती जसे ॥९॥
              **********
१५) माहेरचा बडेजाव सांगणाऱ्या स्त्रीला मुद्दाम हिणवणारे हे गाणे :- 

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला साखळ्या ।'
'असल्या कसल्या साखळ्या बाई फुलाच्या पाकळ्या ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला पाटल्या ।'
'असल्या कसल्या पाटल्या बाई हाताल्या दाटल्या ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिले मला गोट ।'
'असले कसले गोट बाई हत्तीचे रोट॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बिंदी ।'
'असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंधी ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझा ग माहेरच्यांनी दिला मला हत्ती ।'
'असला कसला हत्ती बाई उधळतो माती ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?
'माझ्या ग माहेरच्यांनी दिला मला गडी ।'
'असला कसला गडी बाई, मिजास बडी ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बाई ।'
असली कसली बाई तिला रीतच न्हाई

*************
१६ ) आड बाई आडोणी, 
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली सुपारी, 
आमचा भोंडला दुपारी ।।

आड बाई आडोणी 
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली मासोळी 
आमचा भोंडला संध्याकाळी ।। 

आड बाई आडोणी 
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली कात्री 
आमचा भोंडला रात्री ।। 

आड बाई आडोणी 
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडला शिंपला 
आमचा भोंडला संपला

*************************
 जीवनाचे सार या भोंडल्या किंवा हादग्या मधे सांगितले आहे.
हस्त नक्षत्र परतीचा कधीही कुठेही न सांगता येणारा जोरदार पाऊस हत्ती सारखा ज्याला समोर ठेवून मुलींचे महिलांचे गाणे हसत खेळत म्हंटले जाते यामागे खूप 
खूप मोठ्ठे अनुभव जगण्यास छानसे संदेश दिलेले आहेत म्हणूनच भोंडला- हादगा हे मुलींनी,
महिलांनी खेळत संस्कृती जपली पाहिजे & पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला  पाहिजे.

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

📢🌐 *SCERT महाराष्ट्राचा डिजिटल शैक्षणिक खजिना – आता एकत्रित स्वरूपात!*

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या संकेतस्थळावरील सर्व डिजिटल शैक्षणिक साधने व संदर्भ साहित्य आता एका ठिकाणी उपलब्ध झाले आहे.

या दस्तऐवजात विभागनिहाय प्रत्येक विभागाने तयार केलेले विषयवार साहित्य समाविष्ट असून, हे साहित्य अतिशय दर्जेदार आहे. हजारो शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून व त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित ही साधनसंपत्ती विकसित करण्यात आली आहे.

यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा यांना आवश्यक असलेली सर्व शैक्षणिक साधने एकाच ठिकाणी, सोप्या व सुलभ पद्धतीने उपलब्ध झाली आहेत.

📖 *या संकलनात समाविष्ट विभाग:*
✅ माहिती तंत्रज्ञान व ई-लर्निंग प्लॅटफॉर्म
✅ मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र यांसारख्या विषयांचे अध्ययन साहित्य
✅ शिक्षक प्रशिक्षण व मार्गदर्शिका
✅ वर्गनिहाय सेतू अभ्यास पुस्तिका, शिकू आनंदे मालिका
✅ NEP-2020 अनुषंगिक नवीन उपक्रम
✅ पायाभूत शिक्षण, मूल्यांकन, SQAAF मार्गदर्शन
✅ कला, क्रीडा, समता, समावेशक शिक्षण माहिती
✅ स्पर्धा परीक्षा तयारी साहित्य (इयत्ता ५वी–१२वी)
✅ संशोधन, समग्र शिक्षण, साक्षरता केंद्र व इतर विभाग

*✨ वैशिष्ट्ये:*
🔹 साहित्य विभागनिहाय व विषयनिहाय संरचित
🔹 मोफत व मुक्त प्रवेश – थेट डाउनलोड लिंक उपलब्ध
🔹 दर्जेदार व अनुभवाधारित सामग्री
🔹 शिक्षक व तज्ञांच्या सक्रिय सहभागातून विकसित
🔹 विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा – सर्वांसाठी उपयुक्त
🔹 राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) अनुरूप उपक्रमांचा समावेश
🔹 अभ्यासक्रम, कौशल्यविकास व स्पर्धा परीक्षेसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा

*🌟 फायदे:*
👩‍🏫 शिक्षकांना – अध्यापन अधिक सुलभ व आधुनिक
👦 विद्यार्थ्यांना – अभ्यास, स्पर्धा परीक्षा व कौशल्यविकासासाठी उपयुक्त साधने
🏫 शाळांना – गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी थेट संसाधने
👨‍👩‍👧 पालक व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी – एकाच दस्तऐवजात संपूर्ण मार्गदर्शन

📂 *PDF येथे डाउनलोड करा:*
[SCERT Website – संकेतस्थळावरील उपलब्ध डिजिटल शैक्षणिक साधनांविषयी संपूर्ण मार्गदर्शिका (ऑगस्ट 2025)]
🔗 https://maa.ac.in/documents/SCERTWebsite_links.pdf

👉 कृपया हा दस्तऐवज शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी/कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांना मोठ्या प्रमाणावर शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या डिजिटल शैक्षणिक साधनांचा थेट व सर्वसमावेशक लाभ घेता येईल.

✍️ – *IT विभाग, SCERT महाराष्ट्र*

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

मारिया आंद्रेत्ज़ीक : भाला फेकून हृदय जिंकणारी पोलंडची झंझावाती खेळाडू

एक आहे मारिया आंद्रेत्जि़क. २५ वर्षांची पोलॅन्डची खेळाडू. भालाफेकमधे २०१६च्या रिओ ऑलम्पिकला तिचं पदक अवघ्या २ सेंटीमीटरने हुकलं. २०१८ उजाडला आणि कळलं की तिला हाडांचं कॅन्सर आहे. टोकियो ऑलम्पिकमधे सहभागी होण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलेलं. 

सुदैवाने ऑपरेशन यशस्वी झालेत आणि मारिया परत फील्डवर आली. २०२०च्या समर ऑलम्पिकला सिल्वर मेडल पटकावलं आणि टोकियोचे दारही उघडलेत. टोकियोत तिने स्वतःचा रेकॉर्ड आणि पोलॅन्डचा राष्ट्रीय रेकॉर्ड तर मोडलाच; पण त्याच सोबत विश्वविक्रमाच्या यादीत आजतागायतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी करत तिने सिल्वर मेडलही पटकावलं.

मारिया आंद्रेत्जि़क जेव्हां टोकियोत ही कामगिरी करत होती,,क्निंकं ko koi kookppppmpkpompklllpkkk lko ommppmpmpmpmpmpmpmpmpl ok l  तेव्हां मायदेशी पोलॅन्डमधे एक लहान मुलाचे आईबाप हैराण होत होते. त्यांच्या ८ महिन्याच्या मिलोस्ज़ेक मलिसाला हृदयाच्या एक खूप दुर्मिळ विकार आहे. ह्या मुलाच्या आजारावर उपचार एकच - हृदयावर शल्यक्रिया. पण हे विकार असं आहे की इतक्या लहान पोरावर ह्या विकाराची शल्यक्रिया करायला अक्ख्या पोलॅन्डमधे एकही शल्यचिकित्सक किंवा हॉस्पिटल तयार नव्हतं.

अनेक ठिकाणी नकार पचवल्यावर अमेरिकेत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरला ह्या शल्यक्रियेची व्यवस्था असल्याचं कळलं. मात्र तिकडे संपर्क केल्यावर त्यात ३,८५,००० डॉलर म्हणजे भारतीय चलनात जवळपास ३ कोटी रुपयांचा खर्च ऐकून मिलोस्ज़ेकच्या आई बाबांच्या तोंडाचं पाणी पळालं. 

मिलोस्ज़ेकच्या आई-वडिलांनी crowd funding साठी प्रयत्न केलेत पण त्यात निम्मे पैसेच एकत्र झालेत. crowd fundingच्या नियमांनुसार दिलेल्या कालावधीत पूर्ण रक्कम एकत्र होऊ शकली नाही, तर crowd funding फोरम दानदात्यांना त्यांचे पैसे परत करते. मिलोस्ज़ेकच्या आईवडिलांवरही ही वेळ येऊन ठेपली. कॅम्पेन संपायला अगदी मोजके दिवस उरले होते. त्यांनी आवश्यक अशी अर्धी रक्कम अजून एकत्र करण्यासाठी fund raiserच्या पोस्टवर हाक मारली - "आमच्या मिलोस्ज़ेकला वाचवा." मारियाने ही हाक ऐकली.

मारियाकडे एवढे पैसे तर नव्हते, पण तिच्याकडे दोन दुर्लभ गोष्टी होत्या. एक - मदत करण्याची अदम्य इच्छाशक्ती, आणि दुसरं - तिचं दहा बारा दिवसांपूर्वी जिंकलेलं ऑलम्पिकचं सिल्वर मेडल. तिने तडक ते मेडल मिलोस्ज़ेकच्या उपचारासाठी लिलावात काढलं. 

हे मेडल नाही, तिचं स्वप्न होतं. जे स्वप्न २०१६ला हुकलं होतं, २०१८ला पूर्णपणे भंगच झालेलं, आणि २०२१मधे हे स्वप्न पाच वर्षांची मेहनत, साधना, तपश्चर्या, ध्यास लावून मेडलच्या रुपात तिने साकारलं होतं. अटीतटीच्या परिस्थितीत अनोळखी माणसांसाठी तेच तिने विकायला काढलं.

पोलॅन्डच्या एका सुपरमार्केट चेन झाबका पोल्स्काने हे मेडल विकत घेतलं सव्वा लाख डॉलर्समधे म्हणजे साधारण ९३ लाख रुपयांत, हे पैसे थेट फंड रेजर संस्थेकडे जमाही केलेत. पण झाबका पोल्स्काचे मालक इकडेच थांबले नाहीत. त्यांने मारियाच्या मदतीच्या भावनेला तोडीसतोड काम केलं. त्यांनी मारियाचा सिल्वर मेडल तिला परत दिला, आणि सांगितलं - परत कधी, कुणाचं जीव वाचवावेसे वाटल्यास अश्या गोष्टी तुझ्याच हाताशी असाव्यात.

टोकियो ऑलम्पिकमधे ३५० इव्हेंट्स म्हणजे साधारण हजारभर पदक विजेता होते. आपल्या देशाला ७ पदक आलेत, म्हणून त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत जेव्हां ७० पदक येतील तेव्हां नावं लक्षात राहणे कठीण होईल. पण मारिया आंद्रेत्जि़कसारखे खेळाडू खेळावर, रिकॉर्डबुक्समधे आपलं नाव लिहितातच, पण इतिहासावरही आपलं नाव कोरून ठेवतात. ते नाव विसरत नाहीत.

पूर्वीच्या काळात भाले हृदयात खुपसून प्राण घेतले जात असे. मारियाने भाला फेकून प्राण वाचवले, आणि मारियाच नाही तर झाबका पोल्स्कानेही हृदय जिंकले. ह्या घटना अश्या असतात, ज्या आपल्याला बदलायला भाग पाडतात, जगाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देतात, ज्या खेळांवर प्रेम करायला भाग पाडतात. 

ही मुलगी माझी लेक, किंवा लहान बहीण असती, तर खांद्यावर घेऊन नाचलो असतो. नाहीए, तरी हरकत नाही, माणूस म्हणून तिचा अभिमान आहेच... तिची माहिती लक्षात ठेवा, 
नाव - मारिया आंद्रेत्जि़क
देश - पोलॅन्ड
खेळ - जेवलीन थ्रो
पदक - सिल्वर

संपूर्ण खेळाडू म्हणून तीची पूर्ण माहिती आणि संघर्ष ह्यावर .   


 मारिया आंद्रेत्ज़ीक : भाला फेकून हृदय जिंकणारी पोलंडची झंझावाती खेळाडू  

 प्रस्तावना  
क्रीडा जगतात यशाची व्याख्या*केवळ पदकं, विक्रम किंवा गौरवापर्यंत मर्यादित राहत नाही. खरा खेळाडू तो, जो केवळ स्वतःच्या कामगिरीने नव्हे तर आपल्या मानवी मूल्यातून आणि त्यागातून इतिहासात अमर होतो. पोलंडची मारिया आंद्रेत्ज़ीक
 हा त्याच आदर्शाचा जिवंत पुरावा आहे. जीवन-मृत्यूच्या संघर्षात स्वतः उभी राहिलेली ही तरुणी, इतरांच्या आयुष्याचा दीप प्रज्वलित करण्यासाठी स्वतःकडे असलेलं सर्वात मौल्यवान ऑलिम्पिक पदक द्यायला कचरत नाही.  

 बालपण आणि खेळाची सुरुवात  
- नाव** : मारिया आंद्रेत्ज़ीक  
-जन्म** : ९ मार्च १९९६, सुवाल्की, पोलंड  
-खेळ** : भालाफेक (Javelin Throw)  
लहानपणीपासूनच मारियाला ॲथलेटिक्सकडे ओढा होता. शालेय स्पर्धांमधून तिचा प्रयत्न आणि चपळाई दिसू लागली. शिक्षक आणि प्रशिक्षकांनी तिच्या **फेकण्याच्या नैसर्गिक ताकदीकडे** लक्ष दिलं आणि तिला भालाफेकीसाठी तयार केलं. पोलंडसारख्या देशात जिथे भालाफेकला विशेष महत्त्व आहे, तिथे ती स्वतःला सिद्ध करायला सज्ज झाली.  
 २०१६ : रिओ ऑलिम्पिक – हुकलेलं स्वप्न  
फक्त २० वर्षांचीअसताना मारियाने पहिल्यांदाच *रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिच्या थ्रोने साऱ्यांचं लक्ष वेधलं. अंतिम फेरीत मारियाने संपूर्ण ताकदीने झुंज दिली.  

 तिचं थ्रो एवढं जवळ गेलं की ती **ब्रॉन्झ पदकाला अवघ्या २ सें.मी. ने हुकली.**  
 त्या क्षणाने तिला तात्पुरतं पराभूत केलं, पण त्यानेच भविष्यात पदक नक्की जिंकण्याची अढळ जिद्द दिली.  

मारियाच्या आयुष्यातील हा पहिला मोठा धक्का होता – पण तो पुढील संघर्षाची केवळ सुरुवात होती.  

२०१८ : मृत्यूशी झुंज – अस्थि कर्करोगाचा आघात  
खेळाडू म्हणून उंच भरारी घ्यायची होती, अशा वेळी मारियाच्या आयुष्यावर कॅन्सरचे सावट आलं.  
- डॉक्टरांनी तिला हाडांचा कर्करोग (Osteosarcoma)असल्याचं सांगितलं.  
- तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.  
- त्या कालखंडात टोकियो ऑलिम्पिकचं स्वप्न जवळपास विफल झालं.  

खेळापासून दूर, जीवन धोक्यात असताना, मारियाने 
मानसिक आणि शारीरिक दोन्ही लढाई लढली. तिच्या चिकाटीमुळे आणि योग्य उपचारांमुळे ती हळूहळू पुन्हा उभी राहिली.  

२०२० – टोकियो ऑलिम्पिक : पुनरागमन आणि यश  
कोविडमुळे पुढे ढकललेले टोकियो २०२० ऑलिम्पिक (२०२१ ला झालेले)मारियासाठी पुनर्जन्मासारखे होते.  
तिने केवळ स्पर्धेत भाग घेतला नाही, तर आपला 
वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम** केला.  
पोलंडचा **राष्ट्रीय विक्रम मोडला.**  
 जागतिक स्तरावर आजवरच्या इतिहासातील **तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी** नोंदवली.  
अखेरीस, तिने **सिल्वर मेडल पटकावलं.**  
हा क्षण तिच्यासाठी केवळ पदक जिंकण्याचा नव्हता, तर संपूर्ण जगाला सांगण्याचा होता –  
कर्करोगालादेखील हरवून मी पुन्हा उठले आहे."
पदकाचा त्याग : एका अठराव्या पातळीची मानवीता  
टोकियोतील विजयाच्या काही दिवसांतच पोलंडमध्ये एका कुटुंबाची हाक तिच्या कानावर आली.  

८ महिन्यांचा मिलोस्ज़ेक मलिसा** नावाचा लहानगा, दुर्मिळ जन्मजात हृदयविकाराने त्रस्त होता.  
 शस्त्रक्रियेसाठी **अमेरिकेत ३.८५ लाख डॉलर्स (जवळपास ३ कोटी रुपये)** लागणार होते.  
पालकांनी *crowdfunding* सुरू केली, पण अर्धीच रक्कम जमली.  
थोडे दिवस उरले होते, अपूर्ण रक्कम जमली नाही तर मुलावरचा उपचाराचा मार्ग बंद होणार होता.  
मारियाचा निर्णय  
मारियाकडे लाखो रुपये नव्हते, पण तिच्याकडे **ताजं जिंकलेलं ऑलिम्पिक सिल्वर मेडल** होतं – तिचं स्वप्न, तिचा अभिमान, तिच्या संघर्षाचं प्रतीक.  
 तिने तोच **सिल्वर मेडल लिलावात दान केला.
 एका खेळाडूसाठी ही केवळ वस्तू नव्हती – ते वर्षानुवर्षांच्या घामाचं आणि आयुष्यातील मोठ्या त्यागाचं फलित होतं.  
झाबका पोल्स्का : उदार परतावा  
 पोलंडच्या प्रमुख सुपरमार्केट चेन झाबका पोल्स्का ने ते पदक विकत घेतलं.  
 त्यांनी सुमारे १.२५ लाख डॉलर्स (९३ लाख रुपये)दान केले.  
 हे सर्व पैसे थेट त्या लहान मुलाच्या उपचारासाठी वापरले गेले.  
परंतु त्यांनी फक्त एवढंच केलं नाही त्यांनी मारियाला तिचं **सिल्वर मेडल परत दिलं** आणि सांगितलं –  
  “हे पदक भविष्यात, जर पुन्हा कुणाचा जीव वाचवायचा असेल, तर तुझ्या हातात असावं.”*  

हा प्रसंग जगासमोर **क्रीडात्मक मानवीतेचे सर्वोच्च उदाहरण** बनून राहिला.  

 मारियाच्या आयुष्याचे प्रेरणादायी धडे  

१.अपयश म्हणजे समाप्ती नाही** : रिओ ऑलिम्पिकला २ सें.मी. ने हुकलेलं पदक पुढील प्रयत्नांना अधिक भक्कम केलं.  
२. आजारी पडूनही जिंकणं शक्य आहे** : कर्करोगासारख्या आजारावर मात करून ऑलिम्पिकमध्ये यश मिळवणं हे दृढ इच्छाशक्तीचं सर्वोत्तम उदाहरण.  
३. माणुसकी खेळापेक्षा मोठी** : स्वतःचा अभिमान, स्वप्न आणि गौरव गमावूनसुद्धा एक अनोळखी मुलाचा जीव वाचवायला तयार होणं.  
४. जीवन हे इतरांसाठीही जगणं असतं** : खेळ म्हणजे केवळ विक्रम नव्हे, तर समाजासाठी आदर्श ठेवणंही आहे.  
५. संघर्षातून नवी ऊर्जा मिळते** : आजारपण, दुःख आणि हतबलता ही हार नाही तर आणखी उंच भरारी घेण्याची साधनं ठरू शकतात.  

 निष्कर्ष  
मारिया आंद्रेत्ज़ीक ही केवळ पोलंडसाठीच नव्हे तर **संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान** आहे. तिच्या जीवनकथेतून विद्यार्थ्यांनी हे शिकावं –  

- अडचणींचा सामना करताना हार मानायची नाही.  
- जिंकण्याचा आनंद जितका महत्वाचा आहे, तितकीच **माणुसकी आणि सहानुभूती** देखील महत्त्वाची आहेत.  
- खेळाडू म्हणजे केवळ क्रीडांगणातला नायक नसतो, तर तो समाजासाठी प्रकाशस्तंभ ठरतो.  

ही कहाणी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते 
“क्रीडा हे जीवन शिकवणारी सर्वात शक्तिशाली शाळा आहे.” 


Featured Post